*सुनिल वानखडे जिल्हा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित*-
अकोला येथे नुकताच ,दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र् शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला याच्या तर्फे प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणारा एकमेव जिल्हा दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार, अनुसूचीत जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, शेळद ता- बाळापूर येथील सहाय्यक शिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनिल भाऊराव वानखडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णव व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार सामाजिक कार्य,शैक्षणिक, दिव्यांग ,क्रीडा, रक्तदान, कळसूबाई शिखर चढाई व दिव्यांग मतदान जन जागृती यामधील भरीव कामगिरी बद्दल त्यांना या पुरस्काराने जिल्हा परिषद,अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व अकोल्यातील दिव्यांग बंधू, भगिनी, मित्र परिवार व सहकारी यांनी त्यांचे अभिंनदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.