ताज्या घडामोडी

महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर याचे स्पष्टीकरण

AB7

 

फसव्या संदेशांना बळी पडू नका बाल आशिर्वाद नावाची कोणतीही योजना नाही

> महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर याचे स्पष्टीकरण

अकोला, दि. १२ : ‘ मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’ अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणूकीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये ‘दि. 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4000 रु. मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे’ असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे.

त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे. अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पहिला मजला, कोषागार इमारत, जिल्हाधिकारी आवार, अकोला या कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.