ताज्या घडामोडी

प्रेयसी निघून गेल्याने युवकाची आत्महत्या

AB7

प्रेयसी निघून गेल्याने युवकाची आत्महत्या

राहेरी बु. : प्रेयसी घरातून निघूनगेल्याने वर्दडी येथील २५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १९ मार्च रोजी घडली. समाधान लक्ष्मण आटोळे असे मृतक युवकाचे नाव आहे. या युवकाने आत्महत्येपूर्वी समाजमाध्यमावर अखेरचा व्हिडिओ शेअर केला होता. समाधान आटोळे याचा दोन-तीन वर्षांपूर्वी एका महिलेशी विवाह झाला होता. समाधान व त्याचे कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या हलाखीत असून, दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून केशवशिवणी गावातील एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. समाधान पत्नी व प्रेयसीसह वेगळे राहत होता.

१३ मार्च रोजी प्रेयसी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाधान अस्वस्थ झाला. तो दारू पिऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर, १९ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता समाधानने केशवशिवणी-दुसरबीड रस्त्यावर विष प्राशन केले होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.