डॉ. राम गायकवाड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना शासकीय सुविधा आणि आरोग्य उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता स्थानिकांनी या केंद्राचा लाभघ्यावा
AB7
डॉ. राम गायकवाड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना शासकीय सुविधा आणि आरोग्य उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता स्थानिकांनी या केंद्राचा लाभघ्यावा
डोणगाव : राज्य महामार्गावर वसलेलेडोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या केंद्रात मिळणाऱ्या शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी बाहेरील जिल्ह्यांतील रुग्णदेखील येथे येत असतात. सध्या तापलेल्या उन्हामुळे आणि वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात दररोज सुमारे १०० ते १५० रुग्णांची तपासणी होत आहे. उन्हाळ्याच्या काळात
होणाऱ्या उष्माघाताच्या घटनांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत.
डॉ. राम गायकवाड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना शासकीय सुविधा आणि आरोग्य उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता स्थानिकांनी या केंद्राचा लाभघ्यावा, असे त्यांनी सांगितले.