प्रति,
दिनांक: 18/01/2025
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मुंबई -आंदोलनकरते अकोला जिल्हाला मातंग समाज एकीकृत समिती.
विषय :
दिः 18,19,20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मा.मुख्यमंत्री न्याय द्या। तीन दिवशीय धरणे आंदोलन.
महोदय,
आपणास विनंती पुर्वक अर्ज सादर करतो की,मातंग समाजाच्या विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री न्याय द्या.तीन दिवशीय धरणे आंदोलन मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकोला जिल्हा समस्त मातंग समाज व लाभार्थी यांच्या वतीने करण्यात येत आहे.या आंदोलनामध्ये दि.18,19,20 जानेवारी 2025 या तीन दिवसामध्ये दररोज 11 ते 5 धरणे आंदोलनामध्ये बसण्यात येईल.
…प्रमुख मागण्या..
1) लो.अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मिळणा-या कर्ज प्रकरण मंजूर व वाटप करण्याकरिता शासकीय जमानतदाराची व सातबारा जामीनदाराची अट रद्द करण्यात यावी.व लॉटरी पध्दत बंद करण्यात यावी.
2) अकोला जिल्ह्यातील भूमिहीन मातंग समाज कुटुंबाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत लॉटरी पध्दत बंद करून जमीन विकणा-यांचा प्रस्ताव मान्य करून पसंतीच्या कुटुंबाला जमीन विकण्याचा अधिकाराचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा.किंवा शासकीय जमीनीचे वाटप करण्यात यावे.
3) तालुक्यामध्ये कोणत्याही तलाठी सांझामध्ये पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत भुमिहीन कुटुंबाला योजनेचा लाभ देण्यात यावा.
4) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्याकरिता 2001 नंतरचे तिसरे अपत्य ग्राह्वा धरण्यात येत नाही.व शासकीय सेवा कर्मचारी यांना 2005 नंतर तिसरे अपत्य असल्याचे ग्राह्य धरण्यात येत नाही.म्हणून शासकीय सेवा कर्मचारी यांना व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्या-या उमेदवारास 2005 चा. कायदा मंजूर करण्यात यावा.म्हणजे दोघांनाही समान संधी देण्यात यावी.
यासह विविध मागण्यासाठी मा.मुख्यमंत्री न्याय द्या सदर धरणे आंदोलन 18,19,20 जानेवारी 2025 पर्यंत मा.जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा आहोत हे मागण्या सर्व पूर्ण कराव्या अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आज मातंग समाज उपोषणाला बसला काही दिवसात अख्खा बहुजन समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो..
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
💛.जय लहुजी जय भिम.💙