विदर्भ अध्यक्ष पदी श्री योगेश पुंडलिकराव गिते, पुरुष जिल्हाध्यक्ष पदी श्री राजेश तुळशीराम पेंढारी आणि महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. दिपाताई श्रीकृष्णराव दोरकर यांची नियुक्ती
AkolaB7
रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी दुर्गा देवी मंदिर संस्थान लोकमान्य नगर जुने शहर अकोलाच्या प्रांगणामध्ये असलेल्या आई तुळजाभवानी गोंधळी समाज सभागृह समोर गोंधळी समाजाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थान श्री गजाननराव वेले माजी. बी. डी. ओ. जिल्हा परिषद अकोला यांनी भुषवले तसेच व्यासपीठावर सर्वश्री मधुकरराव वाघळकर माजी. पीएसआय, गजाननराव तुळशीराम पाचपोर, गणेश नामदेवराव ढुके, नगरसेविका सौ. प्रमीलाताई गिते, समाजसेविका बेबीताई गिते उपस्थित होते. उपस्थित सर्व समाजाच्या साक्षीने तथा संमतीने तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दुर्गादेवीला हार अर्पण करण्यात येवून देवीचे आशीर्वाद घेण्यात आले. तदनंतर उपस्थितांच्या हस्ते नवीन मंडळाच्या नावाचे म्हणजेच गोंधळी समाज विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य) या नाम करण्याचे उद्घाटन करण्यात येवून केंद्रीय अध्यक्ष पदी समाजाचे जेष्ठ समाजसेवक श्री प्रकाश पुंडलिकराव भागवत यांची नियुक्ती करण्यात आली तसेच त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली ती पुढील प्रमाणे-राजेंद्र तुकाराम गाडगे (कार्याध्यक्ष)
श्री अमोल हरीदास गिते
(सरचिटणीस)
श्री मधुकर भिकाजी सोनारगण (उपाध्यक्ष)
श्री राजेश सुखदेवराव बोटे
(उपाध्यक्ष)
श्री गोपाल सुधाकरराव मुदगल (कोषाध्यक्ष)
श्री प्रवीण महादेवराव नवरखेडे (संघटक)
श्री प्रभाकर सोनाजी पाचपोर (सदस्य)
श्री दिपक पुंडलिकराव अलोट (सदस्य)
श्री विजय विष्णूजी पंचांगे
(सदस्य)
श्री निलेशजी हांडे (सदस्य)
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विदर्भ अध्यक्ष पदी श्री योगेश पुंडलिकराव गिते, पुरुष जिल्हाध्यक्ष पदी श्री राजेश तुळशीराम पेंढारी आणि महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. दिपाताई श्रीकृष्णराव दोरकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे केंद्रीय सरचिटणीस अमोल गिते यांनी केले व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे विदर्भाचे अध्यक्ष योगेश गिते यांनी केले
या कार्यक्रमाला समाजातील बंधू आणि भगिनींनी तथा युवा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.