आज ( 20जानेवारी ) सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा* वैशाली देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे करणार नेतृत्व
Akola B7
आज ( 20जानेवारी ) सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा वशाली देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे करणार नेतृत्व
अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवार, दि. 20 जानेवारी रोजी अकोल्यात सर्वधर्मीय, सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत राजेश देशमुख यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन वैशाली संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. दोन्ही गुन्ह्यातील मारेकऱ्यांना, गुन्हेगारांना aफाशीची शिक्षा देण्यात यावी. या दोघांच्याही कुटुंबाला न्याय द्यावा. महाराष्ट्राला बिहार बनवण्याचे प्रयत्न करीत असलेल्या प्रवृत्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनतेचा सहभाग असणार आहे. सर्व जाती-धर्माच्या पक्षाच्या विविध सामाजिक संघटनेच्या बंधू भगिनींनी, युवक-युवती, महिलांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. परिषदेला राजश्री देशमुख, प्रशांत जानोरकर, राजेशकाळे झेंडे दाखवून निषेधजनआक्रोश मोर्चा आज दि.20 जानेवारीला दुपारी 2 वाजता स्थानिक अशोक वाटिका परिसरातून निघून सामान्य रुग्णालय नियोजित मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल व त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहेत.देशमुख, गजानन हरणे, संजय वानखडे, शौकत अली शौकत, पंकज साबळे, विनायक पवार, संजय सूर्यवंशी, नंदकिशोर गावंडे, संजय देशमुख, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.