
- टीव्ही पाहण्यासाठी शेजाऱ्याकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शेजारी टिव्ही पाहण्यासाठी गेली असता तिच्यावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली असून हि घटना गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी – रात्रीच्या सुमारास उरळ पोलीसस्टेशनला त्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फियार्दीवरून उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका विरुद्ध आरोपीविरुध्द पोक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये उरळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिडीत मुलीने दिलेल्या फियार्दीनुसार ती आत्याकडे मुक्कामी होती दि.२२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरातील इतर सदस्यझोपलेले असताना, ती शेजारच्या घरात टीव्ही पाहत होती. यावेळी आरोपी रामा वावरे हा देखील टीव्ही पाहण्याच्या निमित्ताने तेथे गेला व त्याने पीडितेवर जबरदस्ती केली, असा आरोप सदर अल्पवयीन मुलीने उरळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. सदर प्रकरणी उरळ पोलिस स्टेशन येथे रामा वावरे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.