ताज्या घडामोडी

आपातापा चौकात लूटमार प्रकरणी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यातपोलिसांनी हस्तगत केला लुटीचा माल

AB7

आपातापा चौकात लूटमार प्रकरणी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यातपोलिसांनी हस्तगत केला लुटीचा माल

रात्री अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपातापा चौक परिसरात रात्री १२:०० वाजता एका व्यक्तीला चाकू दाखवून चार अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात लुटले होते. आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्या कडून लुटीचा माल हस्तगत केला.लुटीच्या घटनेची तक्रार फिर्यादीने अकोट फाईल पोलीस ठाण्यात केली होती. फिर्यादीने आरोपींविषयी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्वरित गुन्हेगारांना पकडण्यासाठी योजना आखली, पोलिसांना मिळालेल्यामाहितीनुसार पोलिसांनी चार युवकांना अटक केली, ज्यात संतोष शेट्टी उर्फ पुरुषोत्तम एंगा, ऋषिकेश अंबादास वेले, रोशन त्रिपाठी आणि सुजल उर्फ कलर गणेश राऊत यांचा समावेश आहे, पोलीस तपासात या चारही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.या आरोपींकडून फिर्यादीकडून लुटलेले ४३ हजार रुपये आणि एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फाईल पोलीस स्टेशनचे निरीक्षक परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या डीबी स्क्वॉडने केली.

 

स 3

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.