लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नंदुरबार : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी आंबापाणी, ता. शहादा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शहादा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस संशयित रोगा किल्या वळवी या युवकाने बळजबरी दुचाकीवर बसवून सोबत येण्याचा आग्रह केला. परंतु तिनेनकार दिल्यावर तिला मारहाण केली. मुलीने याबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर शहादा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.