ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांचा लैंगिक अत्याचारपिडीतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांनी वाचविलेआत्महत्येचा प्रयत्नानंतर फुटले बिंग

अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांचा लैंगिक अत्याचारपिडीतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांनी वाचविलेआत्महत्येचा प्रयत्नानंतर फुटले बिंग

मोर्शी : १२ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली. तत्पूर्वी लैंगिक अत्याचार पिडित मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने वडिलांनी तत्काळ तिला विहिरीबाहेर काढले. त्यामुळे बचावली. त्यानंतर पिडित मुलीने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी शिरखेड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणात शिरखेड पोलिसांनी आरोपी अनुप रमेश ठाकरे (२६) व अनिकेत ऊर्फ बाळू छत्रपती बेहरे ((१९, रा. दोन्ही रा. घाटलाडकी, ता. चांदूरबाजार) यांना अटककेली आहे. माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी सायंकाळनंतर १२ वर्षीय मुलगी घरी आली नसल्याचे पाहून वडिलांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी ती मुलगी गावातीलच एका विहिरीवर बसली होती. दरम्यानच तीने विहिरीत उडी घेतल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांनी विहिरीकडे धाव घेतली आणि मुलीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वडिलांनी मुलीला विहिरीत उडी घेण्याचे कारण विचारले असता,दोन्ही आरोपी हे बांधकामांवरीलठेकेदार, मजूर दोन्ही आरोपी हे शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील एका गावातबांधकाम करायला येत होते. दरम्यान त्यांनी अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीवर शारीरिक संबंध केले, घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुला जीबाने ठार मारेन, अशी आरोपींनी मुलीला दिली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ती मुलगी कोणाला काही सांगत नव्हती. दोन्ही आरोपी हे सद्यास सरपंचाच्या घराजवळ सुरु असलेल्या बांधकामस्थळी काम करीत होते. तर मटेस्थिल बनवण्याचा काम सरपंचाच्या घरात चालू आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी आरोपींनी मुलीला बराच वेळापर्यंत सोडले नाही, त्यामुळे अखेर त्यांच्या लैंगिक अत्याचाराला त्रस्त होऊन मुलीने आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार केला आणि तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू सुदैवाने तिच्या वडिलांनी तिचा जीव वाचविला.सहा महिन्यापासून सुरु होते लैंगिक शोषणमिळालेल्या माहितीवरून आरोपी हे घाटलालकीचे असून ते शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घर बांधकाम करण्यासाठी गेल्या सहा-सात महिन्यापासून येत होते. यादरम्यान गावातील त्यांनी एका महिलेच्या माध्यमातून मुलीसोबत मोबाईल फोनद्वारे बोलचाल सुरु केली. त्यानंतर राज काम करणारे ठेकेदार व मजूराने मुलींचे लैंगिक शोषण सुरु केले. गेल्या सहा महिन्यापासून ते मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही युती आदिवासी समाजाची असून १२ वर्षांची आहे.मुलीने सांगितले की गावात बांधकाम करण्यासाठी येणार्या दोन तरुणांनी तिचे लैंगिक शोषण केले आणि तीला जीवाने मारून टाकण्याची धमकी देत आहे. त्यांच्या या लैंगिक अत्याचाराला कंटाळूनमी आत्महत्या करणार होते, असे तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे हे ऐकून वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर १० एप्रिल रोजी सकाळी पिडित मुलीसह आई-वडिलांनी शिरखेड पोलीस , पोलीस स्टेशनदोन आरोपींना अटक – शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना१० एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पिडिताची वैद्यकीय तपासणीयाप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, अल्पवयीन मुलीला १० एप्रिल रोजी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आणण्यात आले होते. दरम्यान रात्री बारा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू होती. परंतु वैद्यकीय चाचणीतील काही मुद्दे तपासणी व्हायचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी ११ एप्रिल रोजी सकाळी पिडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यास डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले, त्यानंतर रात्रभर मुलीसह मुलीची आई व महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी अमरावतीत मुक्कामी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ एप्रिल रोजी पिडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. त्यानंतर पुन्हा दुपारी तीन वाजेपर्यंत मुलीची वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया चालली. एका पिडित अल्पवयीन मुलीचे रात्री १२ वाजता मेडिकल करण्यात आल्यामुळे रुग्णालयात हा विषय चांगलाच चर्चीला आला होता.ती महिला कोण? तीचा मुलीशी संबंध काय ?पिडित मुलगी गावातील एका महिलेच्या संपर्कात होती. त्या महिलेच्या माध्यमातून मुलगी ही आरोपीपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. परंतू अद्यापही ती महिला कोण आहे आणि तिने मुलीला काय सांगितले. महिलेच्या माध्यमातून ती मुलगी आरोपीपर्यंत कशी पोहोचली. या लैंगिक अत्याचारामागे त्या महिलेशी काही तार जुळले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न याप्रकरणात उपस्थित झाले आहे.गाठून या घटनेची तक्रार दिली त्यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना, शिरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी एका आरोपीला गावातील सरपंचाच्याशिरखेड पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्नठाणेदाराचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये १० एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलाला ११ एप्रिलपर्यंत सायंकाळपर्यंत एफआयआरची कॉपी मिळाली नव्हती. पोलिस ठाण्यातील प्रिन्टर बिघडल्याने एफआयआर कॉपी काढता येत नसल्याचे फिर्यादींना पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पिडित मुलीला एफआयआरची प्रतिक्षाच करावी लागली. पिडितेच्या आई-वडिलांना अजूनपर्यंत पोलिसांनी एफआयआर कॉपी दिली नाही. त्यातच मध्यरात्री एका पिडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणात शिरखेड पोलीस काही लपविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? ठाणेदार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत होते का?, दिवसा तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी रात्रीच्या वेळेत कशी काय करण्यात आली, अशा काही चर्चा गावात सुरु होत्या.दोन आरोपींना अटकअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात दोन आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवदिण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पिडित मुलीची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती शिरखेड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तथा ठाणेदार सचिन लुले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

घराजवळील बांधकामस्थळावरून अटक करण्यात आली, तर दुसर्या आरोपी घाटलाडकी गावातून अटक करण्यात आली. याप्रकरणात पिडित मुलीच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी दोन

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून, दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पुढील तपास शिरखेड पोलीस करत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.