आमदार रणधीर सावरकर यांनी आज आपल्या मतदारसंघातील अकोट, तालुक्यातील शेतकऱ्यांची संवेदना भावना जाणून अधिकाऱ्यांना आदेश दिले.
AB7
आमदार रणधीर सावरकर यांनी आज आपल्या मतदारसंघातील अकोट, तालुक्यातील शेतकऱ्यांची संवेदना भावना जाणून अधिकाऱ्यांना आदेश दिले.
अकोला: विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याला व ग्रामस्थाला आधार देण्याचा आदेश दिले होते आज प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शिवावर बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करून सर्वे बरोबर झाला की नाही रस्त्यांची दुरुस्ती ती तसेच वीज पुरवठा संबंधी अडचणी जाणून घेऊन लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्यासाठी नव्हे तर कृतीने काम करणारा असावा व सर्व स्तरावर सर्व स्पर्शी विकास चा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज आपल्या मतदारसंघातील अकोट, तालुक्यातील शेतकऱ्यांची संवेदना भावना जाणून अधिकाऱ्यांना आदेश दिले.
आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदार संघातील अकोट तालुक्यात लगोलग दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करून सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात यावे. कोणीही शेतकरी किंवा नागरिक नुज्क्सन भरपाई पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
माहे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीला खापरवाडी, वरूर जउलका, सावरगाव, विटाली, पुंडा, या पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टीच्या भागात कालबुधवारी (२७ ऑगस्ट) पुन्हा अतिवृष्टी झाल्याने शेतीतील पिकांसह जमीन खरडून जाने आणि घरांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आमदार रणधीर सावरकर यांनी तहसीलदार अकोट, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या सह पाहणी करून झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करण्यात यावेत व पंचनामे करतांना कोनही ही सुत्कार नाही याची खबरदारी अशी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली. नुकसानग्रस्त भागातील शेतात साचलेले पाणी, पाण्याखैली गेलेली पिके, पुरामुळे खरडून गेलेली जमीन, घरांची पडझड, ना दुरुस्त झालेले रस्ते या सर्व क्षतिग्रस्त भागाची अधिकारी आणि नागरिकांसमवेत प्रत्यक्ष मोक्यावर पाहणी केली. सोबतच पिकांवरील आलेली वोंड आळी, हुमणी आळी या मुले होत असलेल्या नुक्सनावर उपाय योजना आणि नुकसानीचा अहवाल सादर करण्याकरिता कृषी विभागाचे अधिकार्यांना सुहाना दिल्या. या परिसरातील नदी नाले उथळ झाल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यामुळे पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये जाऊन नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊळ सदर नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश तहसीलदार चव्हाण यांना दिल्या नुकसानग्रस्त पंचक्रोशीतील ग्राम तरोडा ,कावसा, दिनोडा, लोतखेड, वरुर’ जवळका व खापरवाडी, पुंडा, विटाळी, सावरगाव, इत्यादी गावातील शेतकरी व नागरिक यांच्या नुकसानी बाबतच्या समस्या जाणून घेण्याकरिता वरूर येथे आमदार सावरकर यांनी अधिकारी व नागरिकांच्या सोबत आढावा सभा घेऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्वांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे आस्वस्थ केले. पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांसह अकोट तहसील चे अधिकारी तहसीलदार चव्हाण साहेब कृषी अधिकारी अजित वासेकर परिसरातील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन संयुक्त दौरा करून संपूर्ण नुकसानीची पाहणी केली सोबत संतोष शिवरकर, राजुभाऊ नागमते, विठ्ठल वाकोडे, विजू भाऊ सोळंके, विवेक भरणे, राजेश रावणकर, चेतन डोईफोडे, हरिभाऊ आवारे, अनुप साबळे, विनोद साबळे, संदीप उगले, सोनू ओळंबे, बच्चू पाटील, वानखडे, विनोद मंगळे, मंगेश घुले, सुनील राजगुरू, सतीश सावरकर, प्रवीण डिक्कर, पुरुषोत्तम शिरसाट, काशिनाथ हिंगणकर, अरुण भाऊ शेटे, दामोदर थुटे, तुळशीदास नायसे, सरपंच गणेश पडोळे आदी उपस्थित होते.



