ताज्या घडामोडी

साईबाबा संस्थानचा मोठा निर्णयसाईंच्या मूळ पादुका देशभरात भक्तांच्या भेटीला शिर्डी,  : देशभरातल्या कोट्‌यवधीसाईभक्तांसाठी एक

AB7

साईबाबा संस्थानचा मोठा निर्णयसाईंच्या मूळ पादुका देशभरात भक्तांच्या भेटीला

शिर्डी: देशभरातल्या कोट्‌यवधीसाईभक्तांसाठी एक मोठी बातमी आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्च्या वतीने साईबाबांच्या मुळ ‘चर्म पादुका’ देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील आठ शहरांमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान हा दर्शन सोहळा संपन्न होईल. शिर्डीचे साईबाबा देवस्थान हे देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांसाठी श्रद्धेचं आणि आस्थेचं स्थान आहे. जगभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. आता मात्र साक्षात साईबाबांच्या मुळ ‘चर्म पादुका’ देशभरातील विविध शहरांमध्ये

 

भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यतील आठ शहरांमध्ये या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असतील. 10 ते 13 एप्रिल पर्यंत माहाराष्ट्रातील सांगली शहर आणि जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे साईबाबांच्या मूळ चरण पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. 14 ते 18 एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातीला दावनगेरे, मल्लेश्वरम येथे पाच दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. यानंतर 19 ते 25 एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी येथे या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध

 

असतील. 26 एप्रिल रोजी धर्मापुरी येथून साई बाबांच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होतील. असा तब्बल 2776 किलोमीटरचा या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार आहे. शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि स्थानिक आयोजन कमिटीच्या वतीने हा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

या दर्शन सोहळ्यादम्यान स्थानिक आयोजन कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पादुका सोहळा आयोजित करण्यात आला आहे, त्याच ठिकाणी पादुका ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही भाविकांच्या घरी या पादुका नेण्यात येणार नाहीत. साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षक तसेच साई मंदिरातील पुजारी असा एकूण 20 कर्मचाऱ्यांचा या पादुका सोहळ्यात सहभाग असणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.