पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवारी (18 जानेवारी) रोजी स्वामित्व योजनेत ई-सनदेचे वितरण
> *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवारी (18 जानेवारी) रोजी स्वामित्व योजनेत ई-सनदेचे वितरण*
अकोला, दि. 17 : देशातील 50 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवारी (18 जानेवारी) ई-सनद वितरित करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील घरमालकांना त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सनद वाटपाचा कार्यक्रम नियोजनभवनात सकाळी 11 वा. होईल. स्वामित्व योजनेचा शुभारंभ दि. 24 एप्रिल 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता. निवासी क्षेत्रातील घरांसाठी मिळकतपत्रक देणे हा योजनेचा उद्देश आहे. ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा वापर करून मालमत्तेचे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे नागरिकाचे आर्थिक समावेशन, पतपुरवठा सुलभता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळते. हा कार्यक्रम यापूर्वी दि. 27 डिसेंबरला आयोजित करण्यात आला. मात्र, तो राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आला. आता उद्या कार्यक्रम होणार असून, प्रत्यक्ष कार्यक्रमात अकोला तालुक्यातील मौजा कळंबेश्वर व तेल्हारा तालुक्यातील मौजा भोकर गावातील लाभार्थ्यांना सनदवाटप होईल