परभणी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI )ला गोंधळी महर्षी राजारामबापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी “असे नाव दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप आभार
परभणी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI )ला गोंधळी महर्षी राजारामबापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी “असे नाव दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप आभार.. जगात जर्मनी ,भारतात परभणी अशी जगाला ओळख करून देणारे जगविख्यात गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांच्या कार्याची,कलेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने नुकताच आदेश पारित करुन बापूंचा गौरव म्हणून परभणी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता “गोंधळ महर्षी राजारामबापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामकरण केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ,उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तथा समस्त मंत्री मंडळाचे आणि या कार्यात ज्यांचा सिंहांचा वाटाआहे असे माननीय ना.संजयजी बनसोडे साहेब, परभणी चे प्रथम महापौर आदरणीय प्रताप भैय्या देशमुख यांचे समाजाच्या वतीने, परभणीकर यांच्यावतीने , आणि समस्त कलावंतांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार !आणि या सरकारने परत दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांमध्ये लोककलेला जसा राजाश्रय होता,तसा राजाश्रय महाराष्ट्र शासनाच्या वतीने कलाकारांना दिल्याबद्दल आणि खर्या कलावंतांचा गौरव केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार🙏🙏