हॉकर्स झोनचा उपयोग काय ?
शहरातील मुख्य रस्त्यांवर लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. खुले जागा निश्चित केली आहे. मात्र तरीही या ठिकाणी लघु व्यावसायिक व्यवसाय करण्यास तयार नाही. गांधी रोड, टिळक रोड, मोहम्मद अली रोडवर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमण आता काढण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ही कारवाईची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याच वेळा अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण जैसे थे होत असल्याचे वास्तव आहे.