ताज्या घडामोडी
आपला आनंद इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये
प्रशांत प्रधान अकोला महानगर काँग्रेस कमिटी प्रशासक व संघटक महासचिव यांचे प्रतिपादन
नायलॉन मांजा वापरू नका!
नववर्षाचा पहिला सण असलेला मकरसंक्रांतीच्या सणाला शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, नागरिक पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. सर्वांनी पतंग उडविण्याचा आनंद जरूर घ्यावा. मात्र पतंग उडविण्यासाठी साधा दोरा किंवा धाग्याचा वापर करावा. नायलॉन मांजा वापरू नये.
नायलॉन मांजा मुक्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या गळ्याचा फास होत आहे. आपला आनंद इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये म्हणून नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन सर्व समस्त नागरिकांना करतो आहे.
प्रशांत प्रधान अकोला महानगर काँग्रेस कमिटी प्रशासक व संघटक महासचिव