ताज्या घडामोडी

सविता ताथोड हत्याकांड : फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अकोला : जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जुना हिंगणा परिसरात मंगळवारी पहाटे मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या महिलेची किरकोळ कारणामुळे हत्या झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला होता. आज बुधवारी या फरार आरोपीस पोलिसांनी शिताफीने पकडले.किरकोळ वादातून आरोपी धीरज चुंगडे याने शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या हत्येतील आरोपीला अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अधिनस्त विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांना दिले होते.  आरोपीला पकडण्यासाठी पथक सक्रियपणे शोधत होते. दरम्यान, आरोपी चांदूरजवळील सुकडी गावात दिसल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकातील राज चंदेल, नदीम शेख, जुने शहर पोलीस ठाण्यातील छोटू पवार, सागर सिरसाट यांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले.किरकोळ वादातून घडला थरारअकोल्यातील जुना हिंगणा परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना काल पहाटे घडली. सविता ताथोड असे 48 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. मृतक सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. या वादात आरोपीच्या आईचा देखील समावेश असल्याचे कळते. या वादात मृतक महिलेने आरोपीच्या आईच्या गालावर थापड मारली होती. या अपमानाची खुन्नस आरोपीने सविता ताठोड यांना जिवानिशी मारून काढली. आरोपीने थंड डोक्याने कट रचून सविता यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवून होता.दरम्यान मंगळवारी सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता, त्यांच्या मागावर दुचाकीने गेला. संधी मिळताच आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडले. आणि चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यांच्यासोबत असलेल्या महीलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला, असा घटनाक्रम समोर आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान आज आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. तसेच या हत्याकांडमागे नेमके काय कारण आहे आणि यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का,या दृष्टीने तपास सुरू आहे.

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.