ताज्या घडामोडी

 मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या महिलेची गळा आवळून हत्या; किरकोळ वादातून घडला थरार, अकोल्यातील घटना

AkolaB7

 मॉर्निंग वॉक करिता गेलेल्या महिलेची गळा आवळून हत्या; किरकोळ वादातून घडला थरार, अकोल्यातील घटना

अकोला: अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. बी ए न्यूज 24सविता ताथोड असे 48 वर्षीय मृत महिलेचे नाव असल्याचे समजते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. दरम्यान आज सविता ताथोड savita tathod या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता, आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडले. सोबत असलेल्या महीलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला. पोलीस घटनास्थळी पोहचली असून पुढील तपास करीत आहे. मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, शांतता पसरली आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.