Breaking : भारतात रेल्वे अपघाताची श्रृंखला काही थांबायचं
नाव घेत नाही, अशातच आज पश्चिम विदर्भाची सर्वात सुपरफास्ट एक्सप्रेस समजल्या जाणारी 12111 मुंबई -अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकचा बोडवड रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ३,५४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती होताच भुसावळ रेल्वे आपत्कालीन पथक अपघात स्थळी दाखल झाले आहे. ट्रॅक वरील ट्रक हटवण्याचे प्रक्रिया सुरू आहे. अशातच मुंबईकडे येणारी आणि नागपूरकडे जाणारी दोन्ही ट्रक वरील वाहतूक सध्या बंद आहे. तर सुरत पॅसेंजर ही यामुळे रद्द करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड स्टेशन जवळ बंद असलेल्या गेट जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर बंद असलेल्या गेटचे सुरक्षा भिंत तोडून ट्रक ट्रॅकवर आला आणि तेवढ्यात अंबा एक्सप्रेस आली आणि अपघात घडला. बोदवड शहरातील बाहेर जाण्यासाठी उडान पुलाची व्यवस्था करण्यात आली असल्याने हे जुने गेट बंद आहे. या रस्त्याने कोणतीही येत नसून मात्र ट्रॅक कस काय आला. एकता चालक हा झोपेत असल्याचेही सांगत आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुंबई नागपूर दोन्ही कडील रेल्वे वाहतूक सध्या बंद असून लवकरात लवकर ट्रॅक वरील ट्रक हटवीण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.