खरेदी केंद्रावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या खरेदी केंद्र संचालकांना दिले योग्य निर्देश
Satish Pawar
. सावरकरांच्या सूचनेनंतर अर्ध्या तासात पूर्ववत सुरू झाली सोयाबीनची ऑनलाईन नोंदणखरेदी केंद्रावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या खरेदी केंद्र संचालकांना दिले योग्य निर्देशū
अकोला- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन जलद गतीने व पूर्णपणे विक्री करता यावे यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी करीता 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान गुरुवार दि. 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया खंडित झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आ. रणधीर सावरकर यांना प्राप्त झाल्या. आ. सावरकरांनी तातडीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ. रणधीर सावरकर यांनी लाखनवाडा येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर भेट देऊन तेथील खरेदी यंत्रणेची पाहणी केली व संबंधितांना योग्य निर्देश दिले. लाखनवाडा केंद्रावर गुरुवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या. गोडाऊन मध्ये जागा नाही असे कारण पुढे करून खरेदी प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. सावरकर यांच्यासोबत मोबाईल वरून संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याकरिता आ. सावरकर यांनी तातडीने लाखनवाडा येथील फार्मर प्रोडूसर कंपनी च्या खरेदी केंद्रावर भेट देऊन यंत्रणेला योग्य सूचना दिल्या. तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना कोणताही शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी आ. रणधीर सावरकर यांच्यासोबत अंबादास उमाळे, डॉ. शंकरराव वाकोडे, माधव मानकर, दिलीप मिश्रा, जयंत मसने, विठ्ठल सातारकर, राजेश ठाकरे, रवी गावंडे, किरण थोरात, अभय थोरात, गणेश तायडे, किशोर कुचके, विपुल घोगरे, राजेश बेले, पंकज वाडीवाले, वसंतराव गावंडे, अनमोल गावंडे, अनिल गावंडे, संदीप गावंडे, अमोल गीते, गणेश अंधारे, गोपाल मुळे, वैभव माहोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments