ताज्या घडामोडी

विनोद तावडेंवर कोट्यावधी रूपयांचं वाटप केल्याचा आरोप; नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ, त्या डायरीत नेमकं काय?

निवडणूक काळात विनोद तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोट्यावधी रूपयांचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय, बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले आहेत.

राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. काल प्रचार संपला आहे. उद्या मतदान होणार आहे. असं असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे  नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा सुरु आहे. जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाहीत, तोवर इथून हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

‘त्या’ डायरीत नेमकं काय?

विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते विरार पूर्व मनवेलपाडामधील विवांता हॉटेलमध्ये बसले होते. तेव्हा क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. काळ्या रंगाच्या बॅगमधून डायरी बाहेर काढत क्षितीज ठाकूर यांनी जाब विचारला.

हितेंद्र ठाकूर यांचे आरोप काय?

विनोद तावडे  यांनी मतदारांना वाटण्यासाठी 15 कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. जोवर कारवाई होत नाही, तोवर तावडेंना सोडणार नाही. माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. 25 फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही तावडेंना सोडू. माझा फोन बघा. त्यांचे किती इनकमिंग कॉल आहेत. मला अगोदरच कळालं होतं विनोद तावडे पाच कोटी घेऊन पैसे वाटण्यासाठी येणार आहेत. डायऱ्या मिळाल्या आहेत. काय कायदेशीर कारवाई होते बघू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. नाहीतर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबत इथेच राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन त्यांनी बोलावं, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.