मन सुन्न करणारी घटना, हॉस्पिटलध्ये लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अग्तिनतांडव, 10 बालकांचा मृत्यू
एका हॉस्पिटलच्या NICU विभागात शुक्रवारी रात्री भीषण आग भडकली. या दुर्घटनेत 10 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 16 मुलं जखमी झाली आहेत. NICU हा लहान मुलांचा वॉर्ड आहे.
महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला आहे, 16 जखमी झालेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. NICU च्या अंतर्गत विभागात 30 मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, 16 मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती.
झांसीच्या जवळ असलेल्या महोबा जिल्ह्यातील एका जोडप्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 13 नोव्हेंबरला सकाळी 8 च्या सुमारास या जोडप्याच्या आयुष्यात एका गोंडस बाळाच आगमन झालं होतं. पण आता त्यांच्या आयुष्यात दु:ख आहे. आगीमध्ये होरपळून त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार कसे मिळतील, ते सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. झांसी जिल्ह्यातील मेडीकल कॉलेडमधील ही दुर्घटना दु:खद आणि ह्दयद्रावक असल्याच योगींनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केलीय.