अर्थकारण

भर दिवाळीत अनेकांचा बाजार उठला, शेअर मार्केटमध्ये काही तासांत 6 लाख कोटी बुडाले

ऐन दिवाळीत म्हणजेच ऐश्वर्य, समृद्धीच्या वातावरणात शेअर बाजारावर मात्र संक्रांत आली आहे. दिवाळीनंतरच्या व्यवहाराच्या पहिल्याच आठवड्यात आणि तेही पहिल्याच दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांना फटका बसत आहे. शेअर बाजारात जोरदार विक्री सुरू आहे. जवळपास सर्वच शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. दिवाळीच्या या रोषणाईला कुणाची नजर लागली, असाच प्रश्न सध्या शेअर बाजारात चर्चिला जातोय.

ऐन दिवाळीत शेअर बाजाराच्या समृद्धीला कुणाची दृष्ट लागली, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, ऐन दिवाळीत शेअर बाजारावर संक्रांत आली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर 4 नोव्हेंबरला घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली. ट्रेडिंग वीकच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ घसरणीसह झाली, पण बाजार उघडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण पहायला मिळाली. या मार्केट क्रॅशमध्ये गुंतवणूकदारांचे 15 मिनिटांत 6 लाख कोटींचे नुकसान झाले.

शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांना फटका बसत असून जोरदार विक्री सुरू आहे. जवळपास सर्वच शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीनेही 330 अंकांची घसरण केली आहे.

शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात आणि नोव्हेंबर मालिका सुरू होताच आयटी शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे आज अधिक कमकुवतपणा दिसून येत आहे. पण यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि यूएस फेडची बैठक.

तुम्हाला माहिती आहे की, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निकालाचा फटका केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेलाही बसणार आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठकही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आहे.

BSE सेन्सेक्ससाठी परिस्थिती बिकट दिसत असून तो 1040 अंकांच्या घसरणीसह 78,683 वर व्यवहार करत आहे. निफ्टी तब्बल 330 अंकांनी घसरत असून 328 अंकांच्या घसरणीसह 23976 वर व्यवहार करत आहे. बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 6.8 लाख कोटी रुपयांनी घसरून 441.3 लाख कोटी रुपयांवर आले.

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. या कंपन्यांमुळे बाजारात 420 अंकांची घसरण झाली आहे. तर एल अँड टी, अॅक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्येही घसरण झाली.

6 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीमुळे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांची वाढ जवळपास ठप्प झाल्याने चिंतेत भर पडत आहे. अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये नॉनफार्म पेरोलमध्ये 12,000 नोकऱ्यांची वाढ झाली आहे. ही डिसेंबर 2020 नंतरची सर्वात कमी वाढ आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्थव्यवस्थेत पूर्वीच्या तुलनेत 1,12,000 कमी नोकऱ्यांची भर पडली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.