ताज्या घडामोडी

लक्झरी स्टँड, फक्त नावालाच बस रस्त्यावरच उभ्या!  वाहतुकीला अडथळा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता

AB7

लक्झरी स्टँडच्या नावालाच बस रस्त्यावरच उभ्या!

वाहतुकीला अडथळा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का?

अकोला शहरातील निमवाडी परिसरात लक्झरी बस स्थानक , असल्यावरही ट्रॅव्हलचे चालक रात्रीच्या वेळी चक्क रस्त्यावर रस्त्यावरच बस उभ्याकडून प्रवाशाची उचलतात या खाजगी वाहतूक दादाकडून वाहतुकीच्या नियमांना ठेका दाखविला जात असल्याचे चित्र दररोज दिसून येते राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अकोला शहरातून नागपूर मुंबई पुणे छत्रपती संभाजी नगर इंदूर नाशिक यासारख्या मोठ्या शहराकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या अनेक बस धावतात अकोला दररोज रात्र दिवस दीडशे ते 200 खाजगी ट्रॅव्हलचे आगमन होत असते अकोल्यातील निमवाडी भागात लक्झरी बस स्टॅन्ड ही उभारण्यात आले आहे परंतु या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसल्याने अकोल्यात येणारे खाजगी ट्रॅव्हल्स चालक थेट रस्त्यावरच वसुधा करतात आणि का घडले किरकोळ अपघात आधीच फुल आणि वळण असा दुहेरी धोका असलेल्या या ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्स बसेस उभ्या राहत असल्याने मोठी कोडी होत आहे हा रस्ता पार करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागते अनेकदा किरकोळ अपघातही होतात पोलीस व आरटीओ विभागाकडून ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आल्या तरीही परिस्थितीत हेच गत काही दिवसापूर्वी लक्झरी बस स्टॅन्ड परिसरातला गराडा घातलेल्या विक्रेत्याचे अतिक्रमण हटवण्यात आले. आता या परिसर मोकळा झाल्याने या ठिकाणी बस उभ्या राहतील ही अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात कोणताही फरक पडलेला नाही अतिक्रमण आठवल्यानंतर खाजगी बस रस्त्यावर उभे राहतात त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते तसेच राम लता बिजनेस सेंटर समोरील रस्त्यावरही रात्रीच्या वेळेस चक्क रस्त्यावर लंगड्या उभ्या राहतात त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी नागरिकाची मागणी आहे

महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी जात असताना झाला अपघात

अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.

बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

तिनमंत्री महोदय आज अकोल्यात

अकोला राज्यांचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आकाश कुंडकर आणि आदिवासी विकास मंत्री परा अशोक उईके गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी अकोला दौऱ्यावर येत असून हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे आयोजित भाजपच्या पश्चिम विदर्भातल्या बैठकीला तीनही मंत्री उपस्थित राहणार आहेत महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सकाळी दहा वाजून पन्नास वाजता सकाळ अकोला विमानतळ येथे आगमन होणार असून सकाळी 11:15 वाजता हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे भाजपच्या पश्चिम विदर्भात तर या सक्रिय सदस्यता संघटना बैठकीला ती उपस्थित राहणार आहेत या बैठकीनंतर दुपारी 2:30 वाजता विमानाने नागपूरकडे ते प्रयाण करतील तसेच राज्यांचे कामगार मंत्री तथा जिल्ह्यांचे पालकमंत्री ऍड आकाश फोन कर आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके भाजपच्या पश्चिम विदर्भ स्तरीय सक्रिय सदस्यता संघटना बैठकीला उपस्थित राहणार आहेत

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.