ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मनोज जरांगे यांना नेमकं काय झालं? घरीच उपचार का सुरू?; आता प्रकृती कशी?

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. सततच्या जागरण आणि उपोषणामुळे त्यांना ताप, अशक्तपणा आणि संसर्ग झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर विविध पक्षाचे नेते, आमदार, खासदार मराठा मतांसाठी सातत्याने जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते. त्यामुळे जरांगे पाटील यांचे सतत जागरण होत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपोषण करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, अशक्तपणाचा त्रास होत आहे. तापासोबत त्यांना इन्फेक्शन देखील झाले आहे. तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घसादुखी आणि कफ झाला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना घरीच सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहे. ते नमुने अधिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीची गरज आहे. कारण त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच आज सकाळीही मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.