मावस साळ्याने केली जावयाची निघृण हत्यामायलेकाचा वाद : पोलिसांनी मारेकऱ्याला केली अटक
AB7
मावस साळ्याने केली जावयाची निघृण हत्यामायलेकाचा वाद : पोलिसांनी मारेकऱ्याला केली अटक
यवतमाळ :मायलेकाच्या वादात का आला असे म्हणून मावस साळ्याने बेदम मारहाण करून जावयाची हत्या केल्याची घटना मंगळवार, २९ एप्रिल रोजी रात्री तलाव फैल, पॉवर हाउस येथे घडली. यवतमाळ शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून मारेकऱ्याला अटक केली आहे.शेरू जगदीश ठाकूर (वय ४८ रा. कानपूर उत्तर प्रदेश, ह. मु यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. शहर पोलिसांनी मृतकाची पत्नी राधिका ठाकूर हिच्या तक्रारीवरून मारेकरी नितीन मनोहर कटरे (वय ३७ रा. पॉवर हाउस, यवतमाळ) याला अटक केली आहे. मृतक हा व्यवसायासाठी यवतमाळात आला होता. त्याने १९ वर्षांपूर्वी मारेकरी नितीनच्या मावस बहिणीशी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तो पॉवर हाउस परिसरातच राहत होता. याच परिसरात नितीन आणि त्याचे कुटुंब वास्तव्याला आहे. त्यामुळे मारेकऱ्याचे नेहमीच घरी येणे जाणे होते.२८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मृतक हा कुल्फी विकायला गेला होता. सायंकाळी सात वाजता तो पत्नी राधिकाच्या रसवंतीवर आला. यावेळी पती शेरू मद्य प्राशन करून असल्याने त्याच्याशी पत्नीने वाद घातला. दारू पिणार असेल तर घरी यायचे नाही, असे सांगितले. मंगळवारी रात्री मृतकाची पत्नी राधिका नेहमीप्रमाणे रसवंती बंद करून घरी आली. यावेळी२ खूनदोन खुनाच्या घटनेने यवतमाळ शहरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही घटनांत मृतक व मारेकरी हे जवळचे नातेवाईकच आहेत.२४ तासात झाल्याने यवतमाळ शहर हादरलेपिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा खूनलहान भावाने लोखंडी रॉडने डोक्यात मारून मोठ्या भावाचा खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पिंपळगाव बायपासवरील बालाजी मंगल कार्यालयाजवळ घडली. प्रमोद पंढरी पेंदोरे (वय ३७, रा. तिरुपती सोसायटी, पिंपळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी कविश्वर ऊर्फ बाल्या पंढरी पेंदोर याला अटक केली आहे.
२ २० एप्रिल रोजी मृतक प्रमोद याने घरी वाद घातला होता. त्याला दारूचे व्यसन होते. तसेच शेती आणि घराच्या हिस्से वाटणीसाठी तो त्रास देत होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.
3 आरोपी लहान भावाने सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव 3 बायपास परिसरात मोठ्या भावाच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या प्रमोदला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून प्रमोदला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मारेकऱ्याला अटक केली.
मारेकरी नितीन रात्री ११ वाजता घरी आला. भाऊजीसोबत वादावादी झाली आणि मी त्यांचा त्यांचा खून केला, असे म्हणून घटनास्थळी घेऊन गेला. या ठिकाणी शेरू पडून असल्याच्या अवस्थेत आढळला. त्याच्या शरीराची हालचाल बंद असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृतकाच्या गळ्यावर लालसरपणा, कानाच्या मागून रक्त निघाल्याचे दिसून आले.
मांडीवर दोन्ही बाजूला जखमा होत्या. यावेळी मावशी कविता कटरे हिने माझा व नितीनचा वाद झाला होता. त्यावेळी शेरू वाद सोडविण्यासाठी आला असता, नितीनने बेदम मारहाण केली होती, असे सांगितले. त्यावरून यवतमाळ शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलिसांकडून करण्यात येत आहे.