ताज्या घडामोडी

मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेसचा अकोल्यात ऐतिहासिक थांबा; खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते स्वागताचा क्षण

AB7

मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेसचा अकोल्यात ऐतिहासिक थांबा; खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते स्वागताचा क्षण

 

 

अकोला – अकोला शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस (12261) ही रेल्वे गाडी 1 सप्टेंबरच्या 00:40 वाजता अकोला रेल्वे स्थानकात आगमन झाल्याबरोबर भारत माता की जय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो भाग जय श्रीराम भारतीय जनता पक्षाचा विजय असो, अनुप भाऊ धोत्रे आगे बढो या गगनभेदी. नाऱ्यांनी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 दुम दुमले.

खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे ड्रायव्हर आलो कुमार तसेच त्यांचे सहकारी संजय बॅनर्जी यांचे श्रीफळ शाल देऊन अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने स्वागत केले.

यावेळी आमदार वसंत खंडेलवाल आमदार रणधीर सावरकर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य वसंत बाचोका एडवोकेट अमोल इंगळे, माधव मानकर पवन महाले गिरी शजोशी, विजय तोष्णीवाल एडवोकेट देवाशिष काकड, अरुण खेतान, सजयगोटफोडे, रंजीत खेडकर नितेश पाली नितीन राऊत प्रवीण झापडे विजय इंगळे सतीश ढगे संतोष पांडे कृष्णा पांडे मनोज शाहू हेमंत शर्मा अमोल गीते अमोल दिलीप मिश्रा, बन्सी चव्हाण, एडवोकेट धनंजय दांगडे दांदळे रवी यादव राजेंद्र गिरी रमेश करिअर, मुक्त अन्नमुक्त पाटील पाटे, गोपाल पारधी ऋषिकेश देवर, संतोष डोंगरे गिरिराज तिवारी पवन तिवारी अजय जोशी मिलिंद राऊत शेगोकार, संजय झा डो कार प्रशांत अवचार तुषार विरळ हिरड,, सह पाचशेच्या वर भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या गाडीला अकोला येथे थांबा मिळावा, यासाठी खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर, रेल्वे मंत्रालयाने हा थांबा अधिकृतपणे मंजूर केला आहे.‌ मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12261) वेळेवर असून ती 1 सप्टेंबरच्या पहाटे 00:40 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यावर (31 ऑगस्टची रात्र). या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अकोला महानगरतर्फे अकोला रेल्वे स्थानकात खास स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनुपभाऊ धोत्रे आणि प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते गाडीला हिरवा कंदील दाखवून तिचे स्वागत व सन्मानपूर्वक प्रस्थान करण्यात आले. या स्वागत समारंभाला आ. वसंतजी खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, मा. विजय अग्रवाल, तसेच भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गाडीच्या थांब्यामुळे अकोलावासीयांना प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून, शहराच्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.