जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या पाठपुराव्याला यश —- आता पूर्वीप्रमाणेच बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र मिळणार
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या पाठपुराव्याला यश
—- आता पूर्वीप्रमाणेच बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र मिळणार
अकोला – बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र द्या अशी मागणी जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती, त्या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी यामध्ये दिशानिर्देश देत अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त (प्रशासन) गिता ठाकरे यांनी अमनपा/साप्रवि/आस्था/685/2025 दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी पत्रान्वये चारही झोनला आदेशित करुन पुन्हा बांधकाम प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेने आपल्या मागणीचा पाठपुरावा करुन वारंवार आयुक्तांची भेट घेवून कामगारांच्या समस्या त्यांना समजावून सांगितल्या आहेत. त्यांच्या मागणीची दखल आयुक्तांनी घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम (रोजगार नियम व सेवा शर्त) अधिनियम 1996 अंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनेचे लाभ प्रदान करण्यासाठी इमारती व इतर बांधकाम कामगारांची निर्मिती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्याकरिता बांधकाम कामगारांची मंडळामध्ये नोंदणी होण्यासाठी त्याने मागील महिन्यात ९० दिवस काम केल्याची नियोक्त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. दि. १३ ऑगस्ट २०१४ च्या राजपत्रानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना ९० दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनकर निकम, उपाध्यक्ष गणेश निळे, सचिव अमोल तायडे, सहसचिव शंकर खंडारे, कोषाध्यक्ष जाकीर शहा, सहकोषाध्यक्ष अजय उपर्वट, संघटक शेख ईशाद, सल्लागार गजानन गोजे, महानगर अध्यक्ष कांता सुरेश दुतोंडे, अमोल तायडे, जागीरदार मिस्त्री, जावेद मिस्त्री, हबीब मिस्त्री, सुधाकर निकम, महादेवराव जाधव, मुजफ्फर खान, सैय्यद नईम, अनिस शाह, शेख मेहबुब, साकीब शाह, शाकीरभाई, चॉंद खान यांच्यासह मोठ्या प्रमाणात असंघटीत बांधकाम मजुरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.