नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालय सुरू
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालय सुरू
नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
अकोला,दि 31 : नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, अडचणी, तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे. सातकलमी कार्यक्रमानुसार पारदर्शक, प्रभावी व गतिमान कार्यपद्धती अवलंबावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी तिथे उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व यंत्रणेला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालयातील व्यवस्थेची पाहणी केली. आमदार रणधीर सावरकर, हरिश पिंपळे, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.