धर्मवीराला वंदन करणारी छत्रपती संभाजी महाराज जयंतीभाजप तर्फे साजर
अकोला छत्रपती संभाजी महाराज*असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या छाव्याने केलेला अलंकारीक भाषेत जगविख्यात कर्तुत्वाचा गौरव. करणे प्रत्येक भारतीयांचा कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर पाटील हे होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने, अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष शिवरकर, डॉक्टर शंकरराव वाकोडे विजय अग्रवाल, सुमन ताई गावंडे, गीतांजली शेगोकार वैशालीताई शेळके, माधव मानकर, राजेश बेले, अंबादास उमाळे डॉक्टर अमित कावरे, गिरीश जोशी, सजयगोटफोडे, सिद्धार्थ शर्मा सुभाष सिंग ठाकूर, डॉक्टर अभय जैन, तेजराव थोरात पवन पाडिया, संतोष पांडे संदीप गावंडे अनिल गावंडे गणेश लोड किशोर कुचके विपुल घोगरे गणेश तायडे दिलीप पटोकार रणजीत खेडकर गोपाल मुळे दिलीप मिश्रा अमोल गीते अमोल मोहकार तुषार भिरड, निलेश दिनोरे चंदा शर्मा अर्चना शर्मा, चंदा ठाकूर सारिका जयस्वाल, आम्रपाली उपरवट अर्चना चौधरी, रमेश अल्करी, एडवोकेट धन राज दांदळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य म्हणजे हे छत्रपती संभाजी महाराजांचे वय होते १४ वर्षे. तरीही तत्कालीन राजकीय परिस्थितीची समज, अभ्यास प्रकटतोय.*
*भारताच्या इतिहासात जसे शिवनेरी किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच पुण्याच्या पुरंदर किल्ल्याचेही आहे. याच किल्यावर हिंदवी स्वराज्यासाठी आजन्म लढणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला.*अशा राष्ट्रपुरुषाचा चरित्राचा अभ्यास करून प्रत्येकाने जीवनामध्ये संघर्ष करून यश प्राप्त करणे गरजेचे असे प्रतिपादन किशोर पाटील यांनी केले.
*सुखाने जगायचे असेल तर भारतीय संस्कृती धर्म टिकवणे भाग आहे. आजही ते किती अवघड आहे हे दिसते. पण देव.. देश.. अन् धर्मासाठी प्राणपणाने कसे लढावे याचा आदर्श म्हणजे हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.*
*संभाजी महाराज अवघे दोन वर्षाचे असतांनाच आईचे निधन झाले. यामुळे त्यांचे संगोपन आजी राजमाता जिजाबाईंनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांच्यावर संस्कृती संस्कार केले.छावा’ ही त्यांची जगभर ओळख. छावा हे नाव त्यांना तंतोतंत लागू होते असाच पराक्रम त्यांनी वेळोवेळी केलाय. असे प्रतिपादन डॉक्टर शंकरराव वाकोडे यांनी केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजेंचे हे त्यांच्याच सारखे महापराक्रमी सुपुत्र राजे.स्वराज्य प्रेमाचे बाळकडू त्यांना भोसले घराण्यात मिळाले होते. देशासाठी कार्य करताना किती परीक्षेचा सामना करावा लागतो हे त्यांना ठाऊक होते. अशी यावेळी विजय अग्रवाल यांनी सांगितले.
विपरीत परिस्थितीचा सामना करण्याची.. परीक्षा घेणारी वेळ बालवयातच राजेंवर आली. शिवाजी राजांनी आग्र्याहून आपली सुटका करुन घेतली तेव्हा त्यांच्या सोबत बाळराजेही होते. या सुटकेवेळी राजे होते फक्त नऊ वर्षाचे. स्वराज्यासाठी राजकारणातला हा थरार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. अशा महापुरुषाला नमन करणे राष्ट्र भक्तांचे कर्तव्य*असल्याचे यावेळी आमदार वसंत खंडेलवाल म्हणाले.१६८० मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी शिवप्रभूंचा वारसा चालवून न्यायनितीने राज्य केले. संभाजी राजेंच्या हिंदवी स्वराज्याच्या तुलनेत औरंगजेबाचे राज्य १५ पट मोठे होते. राज्याभिषेक होताच त्यांनी बुरहानपुरवर चढाई करत औरंगजेबाला धडा शिकवला. अशा शूर वीराला इतिहासात सुवर्ण अक्षराने नमन करणे त्यांचा चरित्र घरोघरी व नवीन पिढीला माहिती करून देण्याची गरजेचे आहे त्यांचा स्मारक उभारण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असल्याची ही यावेळी आमदार सावरकर म्हणाले पोर्तुगीज औरंगजेबाला मदत करायचे. या पोर्तुगीजांचाही महाराजांनी पराभव केला. महाराजांचे हिंदवी साम्राज्य थेट दक्षिणेत तंजावर पर्यंत होते.संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ग्रंथ साहित्य निर्मिती केली साहित्यकार शूरवीर देशभक्त संभाजी महाराज यांच्या जयंती साजरा करण्याचा सौभाग्य आपल्याला मिळालं आपण भाग्यवान असल्याचे प्रतिपादन संतोष शिवरकर यांनी केले महाकाय पराक्रमी राजांनी आपल्या राज्यात भाविकांचे संरक्षण करतांना अनेक देवस्थानांना मदत केली.*धर्म संस्कृती तसेच राष्ट्रचेतना सोबत मानवतेचे कार्य करणाऱ्या संभाजी महाराज यांची जयंती प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरांमध्ये साजरी करणे ही काळाची गरज असल्याचे जयंत मसने यांनी सांगितले. भगवान शिवाचे भक्त शिवाजी पुत्र संभाजी यांचे राज्य आकाशापर्यन्त पसरो. हे राज्य समस्त प्रजाजनासाठी कल्याणकारी आहे.” छत्रपती संभाजी महाराजांची ही राजमुद्रा. याप्रमाणेच जनतेसाठी कल्याणकारी असा राज्यकारभार राजांनी केला. केवळ ३२ वर्षाच्या जीवनात त्यांना स्वधर्म टिकविण्यासाठी सतत युद्ध करावी लागली. हिंदवी स्वराज्य प्राणपणाने कसे राखावे याचा आदर्श ठेवला. असे यावेळी अर्चना शर्मा यांनी सांगितले.*
*ज्यांच्या अतुलनीय शौर्यापूढे इतिहासाने नतमस्तक व्हावे अशा या धर्मवीर राजाला शतशः नमन. मानाचा मुजरा अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव राजेश बेले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मानकर संचलन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन डॉक्टर अमित कावरे यांनी केले