ताज्या घडामोडी

मोठी बातमी! ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणेवरून पंकजा मुंडेंचा युटर्न? नेमकं काय म्हणाल्या?

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. यातच बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश हा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेच्या विरोधात भूमिका घेतली होती. आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अजित पवार यांच्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेबाबत रोख-ठोक वक्तव्य केलं . एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. खर सांगायचं झालं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे. सर्व नागरिकांना सोबत घेऊन नेत्यानं काम करणं अपेक्षीत आहे,  त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

मात्र आता त्यांनी या विषयावर थेट बोलणं टाळलं आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ऑन इयर कुठे बोलले आहे का? ते फक्त प्रिंटलाच आलं आहे. यावर मी लवकरच बोलेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवारांकडूनही नाराजी 

दरम्यान दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी देखील या घोषणेवरून नाराजी व्यक्त केली आहे.  आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या घोषणेवरून विरोधक देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.