लग्नप्रसंगी जोपासली जात आहे जागरण गोंधळाची परंपरा
मेहकर: महाराष्ट्रात लग्नात जागरण गोंधळ एक पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, या माध्यमातून, लोक आपल्या देवांना आणि देव-देवतांना आदराने स्मरण करतात यातून नवीन जोडप्याला आशीर्वाद मि ळतो आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आणि समृद्ध जीवन यांसाठी प्रार्थना करतो. या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, गीत-नृत्य आणि म नोरंजक कार्यक्रम असतात, जेणेकरून लग्न समारंभाला एक खास अनुभव मिळतो. जागरण गोंधळात, कुटुंब आणि मित्र एकत्र येतात आणि एक साम दायिक अनुभव घेतात, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. या परंपरेला मेहकर येथील पवारकुटुंबीयांनी कुटुंबातील प्रत्येक लग्न समारंभामध्ये अविरत जोपासत आले आहे, सामाजिक कार्यकर्ते संतोष माधवराव पवार याचां मुलगा प्रकाश यांच्या लग्नप्रसंगी शुक्रवारी माळीपेठ मेहकर येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले दुर्गादास काटे महाराज यांचे आई रेणुका गोंधळ जागरण संच सहकारी विलास मुळे, सुनील पवार, शिवाजी काटे,गणेश गायकवाड, कल्पनाताई वरकड, काटे महाराज यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी नववधूवर प्रकाश पवार व सौ. नेहा प्रकाश पवार यांच्या आयुष्यात आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी पारंपारिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील मंडळी व पाहुणे मंडळी उपस्थित होते.