स्वराज्य भवन मैदानात आनंद मेळ्याचे आयोजन
अकोला : शहरातील स्वराज्यभवन मैदानात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या मेळाव्यात काहीतरी नवीन पाहायला मिळते आणि यावर्षी आनंद मेळ्यात नवीन झुल्यांचा समावेश करण्यात आला आहे, जे पहिल्यांदाच अकोल्यात आले आहेत.स्वराज्य भवनात यंदाच्या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनींची मोठी गर्दी आहे. त्याचे कारण देखील विशेष आहे. आनंद मेळाव्यात नवीन झुल्यांमध्ये बसल्यानंतर नागरिकांना वेगळा अनुभव येत आहे. काहीजण याला रोमांचक म्हणत आहेत, तर काहींना ते थोडे भीतीदायक वाटत आहे. यावर्षी आनंद मेळ्यात जॉइंट व्हील, ब्रेक डान्स, सलाम्बो,यावर्षी आनंद मेळ्यात नवीन झुल्यांचा समावेश मनोरंजन आणि खरेदीचा नागरिकांनी घ्यावा आनंदरमजान ईद व रामनवमी के शुभ अवसरआनंद मेलानावडी, ड्रॅगन ट्रेन जी दुबई थीमवर आहे. लहान मुलांसाठी वॉटर बोट, वॉटर बलून, भीम राईड, बाऊंसी आणि मिनी ट्रेन इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे आणि शहरात दिवसा सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे दिवसभर घरात बसून कंटाळा येऊ नये, म्हणून सायंकाळच्या वेळी कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी आनंद मेळा एक उत्तम पर्याय ठरत आहे.
येथे मनोरंजनासोबतच विविधखाद्यपदार्थ आणि खरेदीसाठी अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सॉफ्टी आईस्क्रीम, चाट, पाणीपुरी, भेळ, शेगाव कचोरी, वडा पाव, चायनीज पदार्थींच्या जोडीला मुखवासासाठी विविध प्रकारचे पान उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फॅन्सी चप्पल, रेडीमेड कपडे, आर्टिफिशियल ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू इत्यादी वाजवी दरात येथे मिळतील. कुटुंबासोबत मनोरंजन आणि खरेदीचा आनंद फक्त आनंद मेळ्यातच मिळू शकतो, हे लक्षात घेऊन नागरिकांनी आनंद मेळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा आनंद मेळा दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील असे आयोजकांनी सांगितले.