खदानमधील जेतवननगरात युवकाची हत्या दोन संशयित आरोपी ताब्यात, दोन गंभीर जखम
अकोला: खदान पोलिस ठाण्याच्याहद्दीतील जेतवननगरात पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी निघृण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दोन गटांत झालेल्या हाणामारीत करण दशरथ शितोडे (वय १९) याचा मृत्यू झाला; तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जेतवननगरात रविवारी सायंकाळी दोन गटांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही गटांतील युवकांनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये करण दशरथ शितोडे याच्यावर वार झाल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला; तर वैभव पुरुषोत्तम शितोडे (२०) आणि विशाल गणेश वरोटे (२८) हे दोघेही या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.२ गटातीलसंशयित ताब्यातया हाणामारीची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार मनोज केदारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटांतील संशयितांना ताब्यात घेतले.संशयितांना घेतले ताब्यातया हाणामारी व हत्या प्रकरणात • खदानचे ठाणेदार मनोज केदारे यांनी तातडीने तपास सुरू केल्यानंतर प्रशिक जावळे, मयुर मस्के या आरोपींना ताब्यात घेतले.या दोन्ही आरोपींवर हत्येचा 3 संशय आहे; तर काही आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.हाणामारीचे कारणजेतवननगरात दोन गटांत हाणामारी झाल्यानंतर यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचे तसेच हाणामारी प्रकरणाला पूर्ववैमनस्य असल्याची माहिती आहे. मात्र खरे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून खदान पोलिस त्याचा शोध घेत आहेत.सर्वोपचार रुग्णालयात आक्रोशजखमी करण शितोडे यांना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच करणचा मृत्यू झाल्याची माहिती येताच कुटुंबातील महिलांनी या ठिकाणी आक्रोश केला. या हाणामारीतील दोन्ही गटातील युवक हे १८ ते २२ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती आहे.