महिला आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
अकोला, दि. २१ : डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश सत्र 25 –26 मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज हे विनामूल्य भरण्यात येत आहेत. संस्था ही फक्त महिलांकरता आहे. संस्थेच्या परिसरात सुसज्ज असे महिला वसतीगृह आहे. महिला उमेदवारांकरिता वयाचे बंधन नाही. संस्थेमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. महिलांकरिता उद्यान जिमखाना आहे. तसेच ग्रंथालय सुद्धा आहे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता संस्थेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रुपये पाचशे विद्यावेतन दिले जाते. संस्थेमध्ये १० व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. यामधून महिलांना रोजगार तसेच स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. प्रवेश अर्ज भरण्यास अंतिम दिनांक 26 जून असून जास्तीत जास्त उमेदवारांनी संस्थेत आजच संपर्क करून प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे साहेब यांनी केले