ताज्या घडामोडी

आ. पठान यांच्या लक्षवेधीनंतर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांचे आवाहन

AB7

आ. पठान यांच्या लक्षवेधीनंतर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला :-गुरुवारी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आ. साजिद खान पठान यांनी विधीमंडळ सभागृहात अन्नपुरवठा विभागाच्या बेताल कारभारावर बोट ठेवत सभागृहाचे लक्ष केंद्रीत केले होते. त्यांच्या लक्षवेधीनंतर अन्नधान्य वितरण अधिकारी रविंद्र यन्नावार यांची झोप उडाली असून त्यांनी लगेच खडबडून जागे होत शिधापत्रिकेसंबंधी कोणतेही कामकाज कोणत्याही एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीमार्फत करू नये, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.शिधापत्रिकेसंबंधी अर्ज कार्डधारकांकडून शासनाच्या आरसीएमएस पोर्टलवर पब्लिक लॉगइनद्वारे स्वतः किंवाकार्यालयात सकाळी १० ते २ या वेळेत प्रत्यक्ष हजर राहून सादर केली जातात. शहर पुरवठा कार्यालयामार्फत त्यासंबंधी नियमानुसार पुढील प्रक्रिया केली जाते.त्यामुळे कुणीही एजंट किंवा त्रयस्थ शिधापत्रिकेसंबंधी व्यक्तीमार्फत कामकाज करू नये. फसवणूक झाल्यास कार्यालय नाही. जबाबदार राहणार शिधापत्रिकेच्या केवळ अधिकारी व कामकाजासाठी कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. ई-शिधापत्रिकांसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह कार्यालयात स्वतः येऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.