महिलांची मोफत आरोग्य तपासण
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगावमिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट, गुजराथी समाज महिला मंडळ व इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर महिलांची मोफत आरोग्य तपासणी उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. सुमन लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.वर्षभरप्रत्येक मंगळवारी दुपारी ४ ते ७ यावेळेत महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. छाया पाटील, भावना चव्हाण, रंजन पटेल, किरण सिंह, शीतल शाह, प्रीती जोशी, हर्षाली पाटील, वैशाली धांडे, वैशाली शिंदे, तनुजा मोती आदींनी परिश्रम घेतले.