दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनजलप्रदाय अधिकाऱ्यांना धरले धारेवर
AB7
दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनजलप्रदाय अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अकोला : शहरात वारंवारहोणाऱ्या दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याविषयी शिवसेना शिंदे गटाकडून शुक्रवारी जलप्रदाय विभाग मध्ये जाब विचारण्याकरिता तीव्र स् आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांना दूषित पाणी प्यायला दिले.हा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला. अकोला शहरातील बहुतांश भागात पथदिवे बंद आहेत तर नागरिकांना वापर न करता जास्त विद्युत बिल आकारण्यात येत असल्यानेआंदोलनकर्त्यांनी वीज बिल ची होळी करुन तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला. नागरिकांना मूलभीत सुविधा चांगल्या प्रतीच्या उपलब्द न करून दिल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शिवसेना नेते अश्विन नवले यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवावा. बरीच ओरड होऊन देखील समस्या सुटत नाही या बाबत संताप व्यक्त केला