शरीरसंपत्तीची उत्पत्ती मैदानी खेळातून होत असते :
डॉ. शाहिना सुल्तान
अकोला : शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती आहे, हीच खरी मानवी दौलत आहे,जीवनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आर्थिकस्थिती उत्तम असून चालत नाही,मानसिकस्थिती उत्तम असली पाहिजे, उत्तम मानसिकस्थितीची उत्तपती शरीरसौष्ठवातून होत असते,शरीरसौष्ठव मिळवण्याची पहिली पायरी खेळ आहे,मैदानी खेळसंस्कृती विकसित झाली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी डॉ शाहिना सुल्तान यांनी केलेमनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक आठ लकडगंज अकोला शाळा स्तरीय खेळाचे भव्यदिव्य क्रिडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका शिक्षणाधिकारी डॉक्टर शाहीन सुलताना, माजी नगरसेवक मोहम्मद इरफान यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी खेळाचे महत्व मुलांना सांगितले व त्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक हफीज बेग, शिक्षक नईम फ़राज़, मतीन, शाकीर, इरफान उर रेहमान ,समिता नायाब, राहत बाजी, समीना बाजी, नौशीन बाजी, सर्वशिक्षक व शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या मनोगतात डॉ शाहिना सुल्तान पुढे म्हणाल्या की पैसा मिळवण्यासाठी माणूस आरोग्य गमावून टाकतो आणि नंतर आरोग्य मिळवण्यासाठी पैसा गमावून बसतो,
आरोग्य जपणारी माणसे खऱ्या अर्थाने जगणं जगत असतात, आता हळूहळू मैदानी खेळसंस्कृतीचा पाया कमकुवत होत चालला आहे,तो मजबूत व्हावा म्हणून शालेयपातळीवर अशा महोत्सवाचे आयोजन निकडीचे झाले आहे. उद्घाटनसत्रात मैदानी खेळ सुरू करण्यात आले यामध्ये मुलींनी व मुलांनी मैदानी खेळात उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला.