होळी-धूलिवंदन उत्सवासाठी गावात पेटल्या गावठी दारूच्या भट्टया; पोलिसांपुढे आव्हानदीनाल्यांचा घेतला आश्रय, कारवाई करेल कोण ?
AB7, चिंटू दुबे पुलगाव
होळी-धूलिवंदन उत्सवासाठी गावात पेटल्या गावठी दारूच्या भट्टया; पोलिसांपुढे आव्हानदीनाल्यांचा घेतला आश्रय, कारवाई करेल कोण ?
आर्वी : होळी आणि धूलिवंदनाचा सणतोंडावर येऊन ठेपला आहे. धूलिवंदनाला विविध कार्यक्रमांसह मोठ्या प्रमाणात दारू पार्टी, मटण पार्टी या सर्वत्र एन्जॉय केला जातो. त्याची तयारी म्हणून ग्रामीण भागात जंगल व नदीनाल्यांच्या आडोशाने ठिकठिकाणी गावठी, हातभट्टी दारूच्या भट्टधा पेटल्या आहेत. हजारो लीटर दारू तयार गाळून त्याचा पुरवठा केला जात आहे. याकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.होळी आणि धूलिवंदनाची सर्वच जण प्रतीक्षा करतात. आदिवासी, बंजारा समाजात तर दोन दिवस आधीपासूनच होळीचा रंग भरला जातो. आदिवासी बांधव कुठेही असला, तरी होळीसाठी आपल्या गावात पोहोचतो. चार ते पाच दिवस त्यांची होळी चालते. इतरही समाजात होळी, रंगपंचमीचे मोठे आकर्षण असते.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया अद्याप थंडबस्त्यातअनधिकृत दारूला पायबंद घालावा, परवानाप्राप्त देशी, विदेशी दारूची अधिकाधिक विक्री व्हावी, त्यातून शासनाला अधिक महसूल मिळावा ही प्रमुख जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. अर्थात अनधिकृत दारूची निर्मिती, साठा, वाहतूक, विक्री यावर प्रतिबंध घालण्याची कारवाई एक्साइजकडून अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षेनुसार ही कामगिरी होत नाही, आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशीच कायम ओरड असल्याने कारवाई शून्य असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील शहरी भागातही वाहतोय दारूचा महापूरशहरी भागात मोठ्या प्रमाणात पाटर्चा असतात. त्यासाठी आधीच दारूची तजवीज करण्यात येते. ग्रामीण भागात चित्र थोडे वेगळे राहते. ग्रामीण भागात पार्टीसाठी खूप आधीपासून तजवीज केली जात नाही, कारण सर्वकाही वेळेवर सहज उपलब्ध होते.कारवाईचे कागदी घोडेदारूमुळे गावागावात भांडणे लागतात, असे सांगत पोलिस कारवाईसाठी पुढाकार घेतात. दारूबंदी करा म्हणणाऱ्या महिलाही एक्साइजऐवजी ठाण्यावरच आपला मोर्चा काढतात. पोलिस एक्साइजपेक्षा अधिक कारवाई दारूवर करीत असले, तरी त्यामागे ‘अर्थ’कारण हा स्वार्थही लपलेला असल्याची चर्चा आहे. एक्साइज विभाग धाडींची एकत्र माहिती देऊन कागदावर ‘कामगिरी’ दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पोलिसांकडूनही कारवाईला अनेकदा बगल दिली जाते. एखाद्याला पकडल्यानंतर काही वेळातच सोडण्यात येते. त्यानंतर तो पुन्हा दारुची विक्री करतो, ही बाब गंभीर आहे.वेळीच उपलब्ध करून देणारे माः आठवडापूर्वीपासूनच तयारीला लागतात. या तजवीजचा भाग म्हणून ग्रामीण भागात आधीपासूनच गावठी दारू तयार करून साठविली जाते. जिल्ह्यात सर्वच भागात होळीसाठी गावर्ट दारूच्या भट्टया पेटल्या आहेत.