आत्महत्या आहे की हत्या नदीपात्रात तरंगत होता महिलेचा मृतदेह
स्थानिक अकोल्यातील नायगाव ईदगा जवळील नायगाव वाकापूर रस्त्यावर खणकाच्या मागे एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे नाव ज्योती दरेकर असल्याचे समोर आले आहे ती सांगवी मोडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांचे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचे कळते स्थानिकांनी नदीत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर नायगाव परिसरात बातमी पसरली आणि मोठ्या संख्येने लोक ते पाहण्यासाठी गर्दी करू लागलेत नदीच्या पाण्यात प्रवाह नसला तरी मृतदेह एकाच ठिकाणी तरंगत होता ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासानंतर स्पष्ट होईल पुढील तपास पोलीस करीत आहे