श्री रेणुका देवी मंदिरात तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळातीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमाची आयोजन
मुख्य संपादक सतीश पवार अकोला
श्री रेणुका देवी मंदिरात तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळातीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमाची आयोजन
*जालना/प्रतिनिधी* – जालना शहरातील रामनगर भागातील गांधीनगर येथील श्री रेणुका देवी मंदिर संस्थानच्यावतीने 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान भव्य प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी भव्य शोभायात्रेने या सोहळ्याला सुरुवात होत असून, तीन दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ, कीर्तन, प्रवचन आदी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. गांधीनगर, घनतृप मारुती मंदिर, सुवर्णकारनगर, तुळजाभवानी मंदिर ते श्री रेणुका देवी मंदिर असा शोभायात्रेचा मार्ग आहे. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य पूजाविधी संपन्न होईल. दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, रात्री 8 वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री विष्णू महाराज बारड यांचे हरिकिर्तन, गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत महापूजा, अभिषेक, होम-हवन आणि अन्य पारंपरिक विधी होतील. रात्री 8 ते 12 या वेळेत ह. भ. प. देविदास धोंगडे, ह. भ. प. बाबासाहेब बेंद्रे आणि ह. भ. प. पृथ्वीराज देवानंद माळी हे गोंधळ कथा सादर करणार आहेत. शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा पूर्णाहूती, महाअभिषेक, 11 वाजता प. पू. गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर यांच्याहस्ते कलशारोहण होणार आहे. 1.30 वाजता महाआरती आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता पुणे येथील ह. भ. प. काका महाराज खैरे यांच्या हरिकीर्तनाने प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याची सांगता होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाश पवार, विशाल पवार, विशाल उगले, अर्जुन कवडे, अक्षय धुमाळ, सुनील पवार, रोहित उगले, विठ्ठल काटे, कचरू सांबरे, दत्ता ठोंबरे, कृष्णा उगले, कृष्णा पवार, जयेंद्र बन्सीले, हरिभाऊ नाटकर, शक्तीसिंह राजपूत, रामकिशन उगले, गणेश पवार, अनिल उगले, प्रेमचंद्र मखानी, ऋषी उगले, लक्ष्मण धुमाळ, सुनील सूर्यवंशी, गणेश जल्लेवार, दत्ता कुरंगळ, रमेश सूर्यवंशी, सुभाष पवार, विठ्ठल काटे, महेश दुसाने, पंडितआप्पा नामदे, सिताराम धुमाळ, राम शुक्ला, गोविंद चित्राल, छगन देवरे, अभिमन्यू जाधव, श्रीमती ज्योती उगले, दगडू पवार, प्रसन्न जाफराबादकर, सोमनाथ कवडे, उद्धव केंधळे, सुखदेव सराफ, विनोद भगत, पांडुरंग उगले, गौतम गेही, हरेश देवावाले, शाहीर आप्पासाहेब उगले, डॉ. बाबुराव लोखंडे, गंगाधर पवार, नंदू सूर्यवंशी, डॉ. विठ्ठल पवार, काशिनाथ इंगळे, विलास पवार, महेश भालेराव, लखन कनिसे, माणिकराव मराठे, विनायकराव भागिले, अमृत पवार, विजय इंगळे यांच्यासह श्री रेणुका देवी मंदिर संस्थांच्यावतीने करण्यात आलेआहे.