पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर यांचा दौरा अकोला
अकोला, दि. २९ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर यांचा दि. ३० एप्रिल व १ मे रोजीचा दौरा खालीलप्रमाणे : दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वा. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन, सकाळी ११ वाजताजल व्यवस्थापन कृती पंधरवडा समारोप सोहळ्यास नियोजन भवन येथे उपस्थित, दुपारी १२ वाजता खुले नाट्यगृहासमोरच्यापरिसरात भारतीय जनता पक्षाच्या बैठकीस उपस्थित, सोयीनुसार खामगावकडे प्रयाण. दि. १ मे रोजी अकोला येथे सकाळी ७.४० वाजता आगमन, सकाळी ८ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती, त्यानंतर सोयीनुसार खामगावकडे प्रयाण.