राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी अकोल्यात
अकोला : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ उद्या (५ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० वा. दीक्षांत सभागृहात होणार आहे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी १०.३० वा. अकोला विमानतळावर आगमन व कृषी विद्यापीठाकडे रवाना, स. १०.४५ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन व दीक्षांत समारंभास उपस्थिती, दु. १२.०५ ते दु. १.१५ पर्यंत राखीव, दु. १.१५ वा. विद्यापीठाकडून विमानतळाकडे रवाना, दु. १.३० वा. अकोला एअरपोर्ट येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बुधवारी अकोल्यात*
अकोला : राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा उद्या, बुधवारी (५ फेब्रुवारी) अकोला येथे आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत सकाळी १०.३० वा. अकोला विमानतळावर आगमन व कृषी विद्यापीठाकडे रवाना, स. १०.४५ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन व दीक्षांत समारंभास उपस्थिती, दु. १२.०५ ते दु. १.१५ पर्यंत राखीव, दु. १.१५ वा. विद्यापीठाकडून विमानतळाकडे रवाना, दु. १.३० वा. अकोला एअरपोर्ट येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.