सायबर जागरूकता कॉलर-ट्यून उपक्रम यशस्वी – आता ही ट्यून बंद करण्याची मागणी
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
सायबर जागरूकता कॉलर-ट्यून उपक्रम यशस्वी – आता ही ट्यून बंद करण्याची मागणी
अकोला:प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी दूरसंचार मंत्रालयाला विनंती केली आहे की, सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली कॉलर-ट्यून योजना आता बंद करण्यात यावी.
जावेद जकरिया यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, ही योजना अतिशय यशस्वी ठरली असून नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढलेली दिसून आली आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, त्यांनी असेही स्पष्ट केले की दररोज आठ ते दहा वेळा एकाच कॉलर-ट्यूनचा अनुभव नागरिकांना आता त्रासदायक वाटत आहे. त्यामुळे आता उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने ही कॉलर-ट्यून बंद करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
जावेद जकरिया हे यापूर्वीदेखील अनेक सामाजिक मुद्द्यांवर सक्रिय भूमिका बजावत आले असून प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे नेहमीच गांभीर्याने लक्ष दिले आहे.