केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
अकोला : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज मंगळवार (६ मे) रोजी अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत.
*त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :* नागपूर येथून सकाळी ८.१० वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व ’हेरिटेज’ कडे प्रयाण.
’हेरिटेज’ येथे दुपारी १२.३० पर्यंत राखीव. दुपारी १२.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ ची (अमरावती–अकोला–खामगाव व अकोला बायपास) पाहणी.
दु.१ वा. अकोला विमानतळाकडे प्रयाण व विमानतळ येथून विशेष विमानाने दिल्ली रवाना