ताज्या घडामोडी

मनपा प्रशासनाने मालमत्ता धारक विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

AB7

अकोला: शिवर येथील एका मंगल कार्यालय कडे आठ लाखाच्या वर मालमत्ता थकीत असल्याने मनपा प्रशासनाने मालमत्ता सील करण्याच्या कारवाईचा बडगा उचलला. मात्र कारवाईच्या दरम्यान मालमत्ता धारक यांनी कारवाईत अडथळा आणून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा केली. यामुळे मनपा प्रशासनाने मालमत्ता धारक विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबात सविस्तर वृत्त असे की, शिवर येथील पुर्व झोन अंतर्गत वार्ड क्र. अे-10 मालमत्ता क्र. 613, दुर्गा माता मंगल कार्यालय यांच्या कडे सन 2017 ते 2025 पर्यंतचा एकुण मालमत्ता कर रूपये एकुण 8,66,192/- थकित असल्याने, 26 मार्च रोजी सिलची कार्यवाही करण्यास मनपाचे अधिकारी कर्मचारी गेले होते. मनपा पुर्व झोनचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, सहायक अधिक्षक तथा जप्ती पथक प्रमुख राजेश सरप, सहायक कर अधीक्षक देवेंद्रकुमार भोजने, कर वसुली लिपिक प्रकाश थुकेकर, लिपिक प्रफुल हंबीर, शिपाई कृष्णराव वाकोडे व सुरक्षा रक्षक संगिता शिंदे यांचा पथकात समावेश होता.कार्यवाही दरम्यान मालमत्ता धारक जगदिश मुरूमकार यांनी वाद निर्माण करून अधिका-यांशी अरेरावीची भाषा केली. तसेच वाद-विवाद करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. पथकाने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यामुळे मनपा उपायुक्त गीता ठाकरे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख चंद्रशेखर इंगळे व त्यांची टिम घटनास्थळावर दाखल झाली. जगदीश मुरूमकार यांनी त्यांच्याशी देखील वाद केला. त्यामुळे अखेर विजय पारतवार यांनी जगदीश मुरूमकार यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्‍ता कराचा भरणा वेळेच्‍या आत करून सील, जप्‍ती व लिलाव सारख्‍या अप्रिय कारवाई टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन प्रशासनाव्‍दारा केले आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.