भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांची जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालयास सुरुवात
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांची जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालयास सुरुवात
अकोला:-स्थानिक आकृती नगर मलकापूर अकोला येथे दिवंगत दुर्योधन श्रीराम तायडे यांच्या स्मृति पित्यर्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीवगंत दुर्योधन श्रीराम तायडे सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संदीप तायडे यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्याम अवस्थी होते. व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रदेश सरचिटणीस मा.प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचेअकोला महानगर अध्यक्ष माजी उपमहापौर मो.रफिक भाई सिद्दिकी, जिल्हा ग्रामीण समन्वय मा.दिलीपजी आसरे, अकोला महानगर कार्याध्यक्ष मा.देवानंद भाऊ ताले, महानगर उपाध्यक्ष मा. योगेश हुमणे. प्रभाकरराव जोशी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांनी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात शिका, संघटित व्हा .संघर्ष करा असा अनमोल सल्ला देण्यात आला यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष शुधोधन तायडे,सचिव शोभा तायडे, सदस्य जयश्री रिकिबे, सदस्य पूजा तायडे ,गुलाबराव जी तायडे,हिम्मतराव सदाशिव रवींद्र दंदे, गणेश ठोकळ ,श्रीकांत थूल, गजानन कोकाटे बहुसंख पदाधिकारी नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची संचालन संदीप तायडे यांनी केले आभार प्रदर्शन अजय बोरकर यांनी मानले .