ताज्या घडामोडी

सोमवारी निघणाऱ्या तिरंगा यात्रेत सहभागी व्हा – कामगार मंत्री एडवोकेट . आकाश फुंडकर

AB7

सोमवारी निघणाऱ्या तिरंगा यात्रेत सहभागी व्हा – कामगार मंत्री एडवोकेट . आकाश फुंडकर

खामगाव : गेल्या महिन्यात पहलगाम येथेपर्यटनासाठी गेलेल्या देशवासीयांवर आतंकवा‌द्यांनी भ्याड हला केला. याचा बदला घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेचे चोख उत्तर देत पाकिस्तानातील ९ हवाई अडडे उदध्वस्त केले. भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी १९ मे रोजी सकाळी १०.०० वा छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम येथून तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. भारत झुकणार नाही, थांबणार नाही. पहलगाम येथील अतिरेकी हलुयानंतर आपल्या सेनेने दिलेलं प्रत्युत्तर हे अभिमानास्पद आहे. वीर जवानांच्या शौयीला सलाम करण्यासाठी आणि भारत मातेस अभिवादन करण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन राज्याचे कामगार तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी कार्यक्रमात मोठया संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.